रावेरात विविध मागण्यांसाठी सेनेतर्फे निदर्शने


रावेर : ओला दुष्काळ जाहिर झालाच पाहिजे, शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तातडीने मिळालीच पाहिजे, जय भवानी जय शिवराय, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा जोरदार घोषणा देत विविध मागण्यांसाठी तालुका शिवसेना, युवासेने तर्फे येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

रावेरात धरणे आंदोलन
शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवा सेना जिल्हा युवाधिकारी अविनाश पाटील, तालुका युवाधिकारी प्रवीण पंडीत, महिला आघाडी तालुका संघटक रुपाली राणे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.




या मागण्यांचा निवेदनात समावेश
तालुक्यात यंदा अती व सततच्या पावसाने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकऱी कमालीचे हवालदिल झालेले असून आर्थिक अडचणीत सापडले आहेत शासनाने याची तातडीने दखल घेत तालुक्यातील तातडीने ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकर्‍यांना वीज बिलात सुट द्यावी, नुकसाग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, कापूस, ज्वारी, मका, सोयाबीन या पीकांना योग्य भाव मिळत नसून शासनाने याबाबत दखल घेवुन हमी भाव जाहिर करून तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करावीत, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक फी माफ करावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
शिवसेना जिल्हा संघटक रवींद्र पवार, तालुका संघटक अशोक शिंदे, शहर प्रमुख नितीन महाजन, युवासेना शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, जिल्हा उप संघटक डॉ.आदिल शेख, शे.लतीफ, राहुल महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल पाटील, प्रमोद कोंडे, तुकाराम कोळी, विनायक पाटील, डिगंबर पाटील, कन्हैया गणवानी, संतोष महाजन, सुरेश पाटील, योगेश धनके, वसीम खान, शे.गोलु, शे.ईस्माईल, ईश्वर कोळी, प्रशांत पाटील, राम शिंदे, अशोक वरणकर, मुकेश पाटील, शे.शाहरूख, महेंद्र बोरनारे, बाबूराव पाटील, पिंटू माळी, चेतन कदम, नुसार खान, समाधान महाजन, मयुर पाटील, दीपक महाजन, प्रशांत बारुदवाले, गजानन धनगर यांच्यासह शिवसेना,युवासेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !