ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन संघ तालुका उपाध्यक्षपदी मयुर अंजाळेकर
भुसावळ : जनकल्याण फाऊंडेशनच्या ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन संघ, भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी मयूर राजेंद्र अंजाळेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. फाऊंडेशनचे संचालक संतोष जाधव तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. सध्या मयुर अंजाळेकर हे आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष तसेच भारतीय मानवाधिकार परीषदेचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी सहा वर्षा आतील 12 हुन अधिक बाळांचे हृदयाचे तसेच कानाच्या शस्त्रक्रिया मुंबई येथे मोफत करून दिल्या आहेत शिवाय चार कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बिग ब्रेकींग : राज्यातील 92 नगरपरीषदांच्या निवडणुका लांबणीवर


