भुसावळातील जुन्या राम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


भुसावळ : जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ व ब्राह्मण युवा आघाडी शाखा भुसावळतर्फे रविवारी भुसावळातील जुन्या राम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ झाला. दहावी व बारावीसह सुमारे 33 गुणवंतांच्या पाठीवर मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली. जळगाव येथील पंकज व्यवहारे व त्यांचे सहकारी मकरंद डबीर यांनी करीअर कौन्सिलिंग या विषयावर गुणवंतांना मार्गदर्शन केले.

नूतन कार्यकारीणीची घोषणा
याप्रसंगी जळगाव येथील ब्रह्मदंड या मासिकाचे संपादक अजय डोळे व ब्राह्मण महासंघाच्या वतीने हेमलता कुलकर्णी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमात आनंदी महिला आघाडी शाखा भुसावळच्या नूतन कार्यकारीणीची देखील घोषणा करण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघाचे तालुका प्रतिनिधी दीपक पाथरकर गुरुजी व ब्राह्मण युवा आघाडी शाखा भुसावळचे अध्यक्ष देवेश कुलकर्णी, शिव भोजन थाळीचे संचालक नमा (उमाकांत) शर्मा, महिला आघाडी व समस्त ब्राह्मण समाजाच्या पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले. प्रसंगी अनिरूद्ध कुलकर्णी, सागर पतकी, देवेश कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, प्रशांत उपासनी, गौरव हिंगवे, जयप्रकाश शुक्ला, आशिष तिवारी, भूषण जोशी, केर्‍हाळकर गुरुजी आदी समाजबांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !