धार्मिक कार्यक्रमांसाठी महामंडलेश्वर जनार्दन महाराज अमेरीकेला रवाना


Mahamandaleshwar Janardhan Maharaj left for America for religious functions फैजपूर : सनातन सतपंथ संप्रदाय व वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी फैजपूरातील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज रविवार, 17 जुलै रोजी मुंबई येथून अमेरीकेला रवाना झाले.

महिनाभर होणार विविध कार्यक्रम
सतपंथ समुदायात पारीवारिक सलोखा, धार्मिक संस्कार, रूढी परंपरा वृध्दींगत होण्यासाठी अमेरीकेतील वेगवेगळ्या राज्यात भारतातील सतपंथ समुदायातील मोठ्या संख्येने स्थायीक असलेले अनुयायी गेल्या चार वर्षांपासून जनार्दन हरीजी महाराज यांचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. त्याचा लाभ परीवारातील लहान थोरांसह सर्वांना मोठ्या संख्येने होतो. यावर्षी तीस दिवसांच्या दौर्‍यात अनुक्रमे 18 जुलै ते 21 जुलै 22 रोजी शिकागो, 22 ते 24 दरम्यान सेंट लुईस, 25 ते 27 नॉर्थ करोलिना, दि. 28 ते 31 फ्लोरिडा, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पेंसिल्वानिया, 8 ते 9 ऑगस्ट न्यू जर्सी, 10 ते 14 न्यूयॉर्क, 15 ते 16 कनेक्टिक्यूट येथे प्रवचन व सत्संग तसेच टॉक शो विथ जनार्दन महाराज 17 ऑगस्ट 2022 ला परतीचा प्रवास असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पेंसिलविनिया (न्यूयॉर्क) येथे खास तरुणांसाठी टॉक शो, संवाद सभेचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रसारण असल्याने भारतासह जगभरातील असंख्य भाविक भक्त याचा लाभ घेणार असल्याचे महाराजांनी सांगितले.





खलघाट बस अपघात : आठ मयतांची ओळख पटली : चार मयत प्रवासी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !