पतीसह सासरच्या जाच्यानंतर संतप्त विवाहितेने हार्पिक प्राशन करीत आत्महत्येचा केला प्रयत्न


After the death of her father-in-law with her husband, the angry married woman tried to commit suicide by consuming Harpic जळगाव : माहेरहुन साडे चारलाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ करण्यात आला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने घरातील हार्पिक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साडेचार लाखांसाठी विवाहितेला छळले
शहरातील रामेश्वर कॉलनीत गायत्री चेतन कोळी आणि त्यांचे पती चेतन शांताराम पाटील हे वास्तव्याला आहे. सोबत सासू आणि नणंद देखील राहतात. सोमवारी 18 जुलै रोजी विवाहिता घरात असतांना सासू आणि पती यांनी विवाहितेला नणंद कच्यिा घरी जाण्यास सोबत जाण्याचे सांगितले. विवाहितेने सोबत जाण्यास नकार दिल्याने पती चेतन पाटील आणि सासू यांनी शिवीगाळ करून विवाहितेला मारहाण केली. तसेच यापुर्वी पती चेतन कोळी याने लग्नात खर्च झालेले 4 लाख 50 हजार रूपये माहेरहून आणावे अशी मागणी केली होती.


छळाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
पैसे देण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला होता. या छळाला कंटाळून रागाच्या भरात घरातील हार्पिक औषध पिऊन घेतले. विवाहितेला तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती चेतन शांताराम कोळी, सासू कल्पना शांताराम कोळी आणि नणंद प्रियंका चेतन कोळी (सर्व रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय सांगता ! : महिला आमदारांनाच घातला आर्थिक गंडा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !