पिंप्रीसेकमच्या महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू
भुसावळ : तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील 45 वर्षीय विवाहित महिलेचे कॅन्सरच्या आजाराने उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मीनाबाई अरुण तायडे (45, पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे. तायडे यांना चेहर्याचा कॅन्सर झाल्यानंतर सेप्टीक झाल्याने दीपनगर जवळील सरगम गेटपासून त्यांना रुग्णवाहिकेतून शनिवार. 16 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू ओढवला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.