मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात चौघांचा मृत्यू
पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात चौघांचा मृत्यू स्वफ्ट कारनं टँकरला मागून धडक दिल्याने झालल्या अपघातात चौघांचा मृत्यू ओढवला तर दोघे गंभीर आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. सिातार्यातून मुंबईच्या दिशेनं येणार्या स्विफ्टनं एका टँकरला मागून जोरदार धडक दिली. त्यात स्विफ्टमधील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अपघात झाल्यानंतर रोडवेज पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, हायवे पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, रसायनी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना त्वरीत पनवेलच्या रुग्णालयात दाखल केलं.