रावेरच्या महिलेला ट्रकने चिरडले


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी दुचाकीवरून जाणार्‍या रावेरच्या दाम्पत्याच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. गुरुवार, 28 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना नायगावजवळ घडली. रावेर येथील सुभाष केशरलाल सैतवाल व त्यांच्या पत्नी रत्नमालाबाई सुभाष सैतवाल (52) हे दाम्पत्य मुक्ताईनगरातील नातेवाईकांकडे लग्नाला दुचाकी (एम.एच.19 सीई 8933) या गाडीने मुक्ताईनगरकडे येत असताना नायगावजवळ असलेल्या जलाल शहा बाबा दर्ग्यासमोर ट्रक (एम.एच,19 झेड.6277) ने दुचाकी कट मारल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जावून पडली तर ट्रकखाली आल्याने रत्नमाला सुभाष सैतवाल यांचा मृत्यू ओढवला. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. या प्रकरणी पंडित जीवनदास सैतवाल (56, रा.रावेर) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवलदार संतोष चौधरी व उमेश महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !