Completed survey to regularize occupied space in Muktainagar मुक्ताईनगरात भोगवटाधारक जागा नियमाकुल होण्यासाठी सर्व्हेक्षण पूर्ण


Completed survey to regularize occupied space in Muktainagar मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत गावठाण त्याचप्रमाणे नगरपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून राहणार्‍या 2011 पूर्वीच्या नगर पंचायत हद्दीत अतिक्रमित जागांवर राहणार्‍या सुमारे 110 नागरीकांची जागा नियमाकुल होण्यासाठी एजन्सी नेमल्यानंतर या एजन्सीने आपले सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. सोमवार, 25 रोजी नगरपंचायतीद्वारा नियुक्त पुण्यातील एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून प्रत्येक घरांवर कोड नंबर टाकण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात त्यांचे कागदपत्रे संग्रहीत करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यामुळे संबंधिताच्या नावावर प्लॉट होतील व रहिवाशांना घरकुल व इतर सेवांचा लाभ घेता येणार आहे. सर्वेक्षण करताना पुणे येथील एजन्सीचे अधिकारी कर्मचारी यांचेसह सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे (नगरसेवक प्रभाग क्र.12) यांची उपस्थिती होती.

अतिक्रमित जागा नियमाकुल होणार !
अतिक्रमित जागा नियमाकुल होणार असून ज्यांच्या तीन-चार पिठ्या ज्या जागेत वाढल्या, रुजल्या त्या रहिवाशांना त्या जागेचे ना मालकी हक्क होते ना कोणत्या सुविधा व नेहमी रहिवास करीत असलेल्या जागेतून प्रशासन काढेल काय ? किंवा उघड्यावर तर संसार येणार नाही अशा भितीत शहरातील अतिक्रमित कुटुंब जगत होते. परंतु या रहिवाशांच्या मुख्य अडचणीची बाब लक्षात घेवून आमदार चंद्रकांत पाटील यांनी य जागा नियमाकुल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नगरपंचायतीद्वारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रीतसर ठराव करून पुण्यातील युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी., कोथरूड या एजन्सीला अधिकृतरित्या सर्वेक्षणाचे काम देवून शहरातील सर्व भागातील सुमारे 2500 रहिवाशी भोगवटा धारक जागांचे सर्वेक्षण करण्याची मोहिम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. सोमवार, 25 जुलै रोजी प्रभाग क्र.12 मधील 110 घरांचे सर्वेक्षण करून त्या घरांवर कोड टाकण्यात आला. एजन्सी तर्फे पुढील काही दिवसात रीतसर अर्ज भरून व कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.




यांच्या उपस्थितीत झाले सर्वेक्षण
प्रभाग क्रमांक 12 मधील शिवराय नगर भागात नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे, युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी., कोथरूड पुणे एजंन्सीचे लिंबराज सूर्यवंशी, मिलिंद देवधर, जयवंत पाठक आदींद्वारा सर्वेक्षण मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान, शहरातील कोणी भोगवटा धारक रहिवासी यांचे सर्वेक्षण नजर चुकीने राहिले असल्यास त्यांनी युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी., कोथरूड पुणे एजंसीचे लिंबराज सूर्यवंशी, मिलिंद देवधर, जयवंत पाठक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरटा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !