सावदा पालिकेत पाच जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी
सावदा : सावदा पालिकेच्या 20 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता पालिका सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. अध्यक्षस्थानी भुसावळचे उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे होते. मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके उपस्थित होते. नवीन आरक्षणानुसार पाच जागांवर ओबीसी उमेदवाराला संधी मिळणार आहे.
असे आहे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग 1 अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग 2 अ- ओ.बी.सी, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 अ- ओ.बी.सी.महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग 4 अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 अ- अनुसूचित जाती महिला, प्रभाग 5 ब- सर्वसाधारण, प्रभाग 6 अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग 7 अ- अनुसूचित जमाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग 8 अ- ओ.बी.सी., ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 अ- ओ.बी.सी.महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग 10 अ- ओ.बी.सी. महिला, ब- सर्वसाधारण. दरम्यान, आरक्षण सोडतीसाठी लिपिक सतीश पाटील, विमलेश जैन, किरण चौधरी, माळी आदींनी सहकार्य केले.

यावल तालुक्यात महिला आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड
रावेर पालिकेत आरक्षणामुळे प्रस्थापीतांना धक्का

