भुसावळमध्ये शिवसेनेच्यावतीने शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य


भुसावळ : शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जुना सातारा भागातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या शंभर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रभाग क्रमांक आठमधील इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जुना सातारा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात झाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन अध्यक्षस्थानी होते. मुंबईचे रावेर लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक अजित झाजम, विवेक भाटकर, संपर्क प्रमुख सुरेश राणे, रेल कामगार सेनेचे ललितकुमार मुथा, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, पप्पू बारसे, राकेश खरारे, विनोद वाघे, दत्तू नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला.

आकाश पाटील यांना भुसावळ भूषण पुरस्कार जाहीर
भुसावळ शहरामध्ये मरीमाता उत्सवात झालेल्या दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता शेकडो लोकांचे प्राण वाचल्याबद्दल आकाश पाटील यांना जिल्हा प्रमुख समाधान महाजन व मान्यवरांच्या हस्ते भुसावळ भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे दीपक धांडे आणि माजी नगरसेविका शारदा धांडे यांनी केले. यशस्वीतेसाठी राकेश खरारे, नरेंद्र लोखंडे, योगेश बागुल, गोकुळ बाविस्कर, अरुण साळुंखे, स्वप्निल सावळे, अमोल पाटील, पिंटू भोई, चेतन भोई, शांताराम बैरम, रिंकू भोई, गौतम तायडे गणेश लोखंडे, राकेश देशमुख, संदीप पाटील, पप्पू पाटील, किरण वाघ, यश फालक, प्रशांत धांडे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !