महाशिवआघाडी सरकार स्थापनेनंतर भुसावळ विभागात जल्लोष
भुसावळसह यावलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी : लाडूंचे वाटप करीत जल्लोष
भुसावळ : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत सरकार स्थापन केल्यानंतर गुरुवारी तीनही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मुंबईतील शिवतीर्थावर शपथविधी घेतल्यानंतर भुसावळातील काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी लाडूंचे वाटप करीत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. याप्रसंगी महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादीच्या विजयाचा घोषणा देण्यात आल्या तर यावलमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी जल्लोष केला.
भुसावळात महाविकास आघाडीतर्फे जल्लोष
भुसावळ- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे विराजमान झाल्यानंतर भुसावळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष नितीन धांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी, गटनेते उल्हास पगारे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्हाटे, काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम, संतोष सोनवणे, नबी पटेल, समाधान महाजन, नगरसेवक अशोक चौधरी, दुर्गेश ठाकुर, सतीश घुले, हाजी सलीम पिंजारी, सिकंदर खान, राहुल बोरसे, निखील भालेराव, सचिन पाटील, साजीद शेख, रणजीत चावरीया, राजू डोंगरदिवे, तालुकाप्रमुख धनराज ठाकूर, संतोष साळवे, विलास खरात, शैलेश अहिरे, कलीम बेग, रहिम कुरेशी, सुनील दांडगे, सुनील ढिवरे, सलीम शेख, अन्वर तडवी, निलेश चौधरी, संदानशीव, सपकाळे, मुकुंद टेलर, अनिता खरारे, राणी खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



यावलमध्ये विजय रॅली
यावल- हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवतीर्थावर घेतल्यानंतर स्थानिक पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढली. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावल शहर शिवसेना-युवासेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी संध्याकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना कार्यालयापासून ते बारी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावल शहरातील सर्व शिवसैनिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयात एकत्र येत रॅली काढली.
यांची होती उपस्थिती
यावल शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना शहर प्रमुख जगडीश कवडीवाले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, बुधवळे नाना, काँग्रेसचे भगतसिंग बापू, काँग्रेस शहराध्यक्ष कादीर खान, नगरसेवक मनोहर सोनवणे, संदीप सोनवणे, अनिल जंजाळे, प्रवीण बोडके, बटू सोनार, इम्राान पहेलवान, शिवसेना उपतालुका प्रमुख संघटक आर.के.चौधरी, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष शेख रीयाज शेख रफिक, शिक्षकसेना जिल्हा संपर्क प्रमुख भूषण नागरे, राकेश बारी, शिवसेना उपतालुका संघटक पप्पू जोशी, शिवसेना माजी तालुका प्रमुख कडु पाटील शहर संघटक सुनील बारी, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना उप शहरप्रमुख संतोष खर्चे, शिवसेना उप शहरप्रमुख मोहसीम खान, युवा सेना उपशहर अधिकारी प्रवीण बडगुजर, युवा सेना शहर समन्वयक सागर बोरसे, युवा सेना उपशहर अधिकारी पिंटू कुंभार, जितू फलक शहर उपप्रमुख, जितेंद्र फलक, योगेश मंगलसिंग चौधरी, शहर उपप्रमुख प्रल्हाद बारी, सुधाकर धनगर, विभाग प्रमुख युवा सेना शहर सरचिटणीस विजय पंडित (कुंभार), युवासेना प्रसिद्धी प्रमुख कुणाल बडगुजर, शिवसेना विभागप्रमुख योगेश पाटील, शिवसेना विभागप्रमुख हरून खान, युवा सेना विभाग प्रमुख गिरीश बडगुजर, शिवसेना शाखाप्रमुख शकिल पटेल, आरीफ तडवी, हमीद पटेल, संजुभाऊ, आकाश कोबी, मयुर धोबी, सारंग बेहेडे व तिघे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भुसावळात महाविकास आघाडीतर्फे जल्लोष
भुसावळ- गुरुवारी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी शपथ विधी घेतल्यानंतर शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने रजा टॉवर चौक, डॉ.बाबासाहेब आंंबेडकर पुतळा, ताजोद्दीन बाबा दर्गाह, रेल्वे स्थानकासमोरील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली. प्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, माजी आमदार नीळकंठ फालक, योगेंद्रसिह पाटील, सलीम गवळी, अकील शाह, रहिम कुरेशी, फकरुद्दीन बोहरी, ईस्माईल गवळी, जे.बी.कोटेचा, शे.मकबुल, जगपालसिंह गील, जॉनी गवळी, अन्वर तडवी, रमजान खाटीक, शकील डीडी, कलीम बेग, फिरोज खान, वसीम शाहा, खान, तौफीक, जैद खान, शे.नुरु, सेना महाराषट्र शिक्षक सेल राज्याध्क्ष शेख.मो.ईलियास, जाकीर पेंटर, नमा शर्मा, नगरसेवक मुकेश गुंजाळ, भरत परदेशी व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
