महागाईविरोधात भुसावळात काँग्रेसचे आंदोलन
घरगुती गॅस सिलिंडरसह जीएसटी व वीज बिल वाढीचा पदाधिकार्यांकडून निषेध : प्रशासनाला मागण्यांबाबत निवेदन
Congress protest in Bhusawal against inflation भुसावळ : वाढत्या महागाईसह बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीएसटी दरातील वाढ आदी मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भुसावळात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोदी सरकारविरोधात पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भुसावळात काँग्रेसचे आंदोलन
भुसावळ ः भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनाश्यक वस्तूवरील वाढलेल्या जी.एस.टी. विरोधात आंदोलन करून केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

या मागण्यांसाठी आंदोलन
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, पीक कर्ज माफ करावे, वाढती महागाई कमी करावी, बेरोजगारांना रोजगार द्यावा, अग्नीपथ योजना व जी.एस.टी.रद्द करावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, महिला शहर अध्यक्ष यास्मीन बी.यांनी निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
भुसावळातील आंदोलनप्रसंगी शहर उपाध्यक्ष महेंद्र महाले, अजगर शेख, जॉनी गवळी, हमीद शेख, शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष हमीदा गवळी, वरणगाव शहराध्यक्ष अशपाफ काझी, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सलीम गवळी, सेवा दल अध्यक्ष संजय खडसे, सुरेश थेटे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, सलमा शेख, फातिमा आपा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
