जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व
भुसावळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उर्वरीत आंतरशालेय नेहरू चषक 15 वर्षाआतील मुलांच्या व 17 वर्षाआतील मुले आणि मुलींच्या स्पर्धेला जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी उद्घाटन केले. यामध्ये बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळचा संघ विजेता ठरले. स्पर्धेचे पारीतोषिक वितरण गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य ए.जेस्सी यांच्याहस्ते झाले. आभार हॉकी प्रशिक्षक अरविंद
खांडेकर यांनी मानले.
विजयी स्पर्धकांची विभागस्तरावर निवड
विजेत्या दोन्ही संघाचे बियाणी मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक एच.एन.पाटील, प्रशिक्षक युसूफ खान, तौशिफ कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धकांची विभागीय स्तरावर झाली असून ते नाशिक येथे खेळण्यासाठी जाणार आहे.

मुलींची स्पर्धेचा निकाल असा
उपांत्य सामन्यात बियाणी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला तर अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूल व बोहरा सेंट्रल स्कूल, पारोळा संघाला 3/0 ने हरवले. मुलांच्या उपांत्य सामन्यात बियाणी मिलिटरी स्कूलने बोहरा सेंटर स्कुलला 3/1 ने हरविले तर अंतिम सामना
बियाणी मिलिटरी स्कूल विरुद्ध बी.झेड.उर्दू.स्कूलमध्ये अंतिम सामना झाला. त्यात बियाणी मिलिटरी स्कूलचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचा 15 वर्ष आतील मुलांचा संघ उपविजेता तर 17 वर्षाआतील मुल व मुलींचा संघ विजयी ठरला.
