Swearing-in ceremony of 18 cabinet ministers in Shinde government: Know the exact news शिंदे सरकारमधील 18 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी : जाणून घ्या नेमकी बातमी


Swearing-in ceremony of 18 cabinet ministers in Shinde government: Know the exact news मुंबई : राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्री मंडळ विस्ताराला मंगळवार, 9 रोजीचा मुहूर्त लाभला होता. मंत्री मंडळाचा तब्बल 40 दिवसानंतर होत असलेल्या विस्तारात नेमकी कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातून जामनेरचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन तसेच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांची नावे सुरूवातीपासून निश्चित मानली जात होती व हा अंदाजदेखील खरा ठरला आहे. एकूण 18 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

राज्यपालांच्या उपस्थितीत शपथविधी
शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार मंगळवारी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित 18 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.



जाणून घ्या कुणा-कुणाची मंत्री पदावर वर्णी

  • शिंदे गटातील या आमदारांची वर्णी
    तानाजी सावंत
    उदय सामंत
    संदीपान भुमरे
    दादा भुसे
    अब्दुल सत्तार
    दीपक केसरकर
    शंभूराज देसाई
    संजय राठोड
    गुलाबराव पाटील
  • भाजपमधील या आमदारांची वर्णी
    गिरीश महाजन
    चंद्रकांत पाटील
    सुधीर मुनगंटीवार
    सुरेश खाडे
    राधाकृष्ण विखे पाटील
    अतुल सावे
    रवींद्र चव्हाण
    विजयकुमार गावीत
    मंगलप्रभात लोढा

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !