बडनेरासह अमरावतीतील तब्लिगी इज्तिमा उत्सवासाठी विशेष गाड्या


भाविकांची होणार सोय : प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

भुसावळ : बडनेरासह अमरावतीतील तब्लिगी इज्तिमा उत्सवासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्यांमुळे रेल्वे गाड्यातील होणारी प्रवाशांची गर्दी कमी होवून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रायगढ-बडनेरा विशेष गाडी
रायगढ-बडनेरा दरम्यान अप 08295 विशेष गाडी शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी पाच वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या पहाटे सहा वाजता बडनेराल पोहोचेल तर परतीच्या प्रवासात डाऊन बडनेरा-रायगड विशेष गाडी सोमवार, 9 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता रायगडला पोहोचेल. या गाडीला चाम्पा, जंजगीर नैला, अकालतारा, बिलासपूर, बेल्हा, भाटापारा, रायपूर, भिलाई पॉवर हाउस, दुर्ग, गोंदिया, नागपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




अंबिकापूर-बडनेरा दरम्यान विशेष गाडी
अप 08297 अंबिकापूर-बडनेरा विशेष गाडी शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 8 वाजता बडनेराला पोहोचणार आहे. डाऊन 08298 बडनेरा-अंबिकापूर विशेष गाडी सोमवार, 9 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता अंबिकापूरला पोहोचेल. या गाडीला बिजुरी, कोतमा, अनुपपूर, बुरहार, शहडोल, बरसिंहपुर, कटनी, जबलपूर, नरसिंगपुर, इटारसी, नरखेर, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला.

नरखेर-दादर विशेष गाडी
अप 01286 अप नरखेर-दादर विशेष गाडी रविवार, 8 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दादरला तीन वाजता पोहोचेल. या गाडीला चांदूर बाजार, नवी अमरावती, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, ईगतपुरी, कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

बडनेरा-पुणे विशेष गाडी
अप 01294 अप बडनेरा-पुणे विशेष गाडी शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी 6.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवी सकाळी 10 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला मूर्तिजापूर, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, जलगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

बडनेरा-कलबुरगी विशेष गाडी
अप 01292 बडनेरा-कलबुरगी विशेष गाडी बडनेराहून शनिवार, 07 डिसेंबर रोजी रात्री 12.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 4.50 वाजता कलगुरगी पोहोचेल. या गाडीला अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

दादर-नवी अमरावती विशेष गाडी
डाऊन 01293 दादर-नवी अमरावती विशेष गाडी दादरहून सोमवार 9 रोजी सायंकाळी पाच वाजता सुटल्यानंतर 3.45 वाजता नवी अमरावती पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-बल्लारशाह विशेष गाडी
डाऊन 01299 पुणे-बल्लारशाह विशेष गाडी गुरुवार, 5 डिसेंबर रोजी 2.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 12.40 वाजता बल्लारशाह पोहोचेल. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपुर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !