काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
भुसावळ : काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहर, तालुका जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे रेल्वे स्टेशनसमोरील ताजोद्दीन बाबा दग्यासमोर माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.मुन्वर खान, सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा डॉ.सुवर्णा गाडेकर, शहराध्यक्ष सलीम गवळी, अकील शाह यांच्याहस्ते मिठाई तसेच अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी मेहबूब खान, रघुनाथ चौधरी, राजेंद्र पटेल, शैलैंद्र नन्नवरे, भगवान मेढे, युवक अध्यक्ष इम्रान खान, रमजान खाटीक, संजय खडसे, डॉ.नईम मजहर, जॉनी गवळी, मकबुल शेख, तौसीफ शेख, कदीर पिंजारी, सुकदेव निकम व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातर्फे सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धन्वंतरी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रसंगी विवेक नरवाडे, विजय तुरकेले, आकाश तुरकेले, शेखरजी तायडे, मनोहर गुरचळ, हर्षलकुमार तुरकेले, राकेश हाटे, रोहीत तुरकेले, सिद्धार्थ सपकाळे, विलास खरात, संतोष साळवे, प्रकाश ढिवरे, मुकेश तायडे, मुकुंद साळुंके उपस्थित होते.




