भाजपाचा सत्कार स्वीकारून उड्डाणपुलावरूनच मुख्यमंत्री मुक्ताईनगरात

प्रहारच्या कार्यक्रमाला वेळेअभावी हजेरी टाळली : राजकीय गोटात प्रचंड खळबळ


भुसावळ : मुक्ताईनगर दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री भुसावळातही येतील, या अपेक्षेने प्रहार पक्षातर्फे नाहाटा चौफुलीवर अपंग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला मात्र आधीच दौर्‍याला झालेला उशीर पाहता मुख्यमंत्री उड्डाणपुलानजीकच भाजपाचा सत्कार करून उड्डाणपूलावरून मुक्ताईनगरकडे रवाना झाल्याने शहरातील राजकीय गोटात खळबळ उडाली. यावेळी मंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते नियोजित कार्यक्रम पार पडला.

मंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते सायकल वाटप
प्रहार पक्षातर्फे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिव्यांग बांधवांसाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री येणार म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तर या मार्गावरील दोन्ही बाजूचे मार्ग बंद करण्यात आले मात्र मुख्यमंत्री भुसावळात न येताच उड्डाणपुलावरून मुक्ताईनगरकडे रवाना झाल्याने मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

उड्डाणपुलावर भाजपतर्फे सत्कार
महामार्गावरील सुभाष गॅरेजजवळ आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, भाजपचे युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरूध्द कुळकर्णी, माजी नगरसेवक मनोज बियाणी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, संदीप सुरवाडे, निक्की बतरा, अजय नागराणी, राजेंद्र आवटे, संतोष बारसे, माजी सभापती सुनील महाजन, रमाशंकर दुबे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !