भुसावळात बेकायदा देशीची विक्री : आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुलीजवळ बेकायदा देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी दुपारी सव्वा वाजता कारवाई करीत माधव भावसिंग ठाकुर (19, रा.शांती नगर, भुसावळ) यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून दोन हजार 496 रुपये किंमतीच्या देशी दारू टँगो पंचच्या 48 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे, नाईक रवींद्र बिर्हाडे, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
