मोबाईलमुळे जग जवळ आले मात्र कौशल्य विकासही महत्वाचा : प्राचार्य डॉ.अनिल झोपे

भुसावळात स्व.बाबासाहेब के नारखेडे स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेंतील गुणवंतांना बक्षीस वितरण


भुसावळ : एकविसाव्या शतकात आपण जगाच्या जवळ गेलो आहोत. मोबाईलच्या रूपाने जग आपल्या जवळ आले आहे मात्र आपल्याला त्यातील काही येते का, नाही तर आपण कौशल्य विकास जाणून घ्या,त्याचा आपल्याला जीवनात मोठाच फायदा होणार आहे, असे विचार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे यांनी केले. स्व.बाबासाहेब के नारखेडे स्मृतिदिनानिमीत्त आयोजित विविध स्पर्धांमधील बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
स्व.बाबासाहेब के.नारखेडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा, कथा व काव्य लेखन स्पर्धा, कथा संग्रह, काव्य संग्रह व कादंबरी लेखन राज्य पुरस्कार बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, प्राचार्य अनिल झोपे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सदस्य संजीव नारखेडे, भाग्येश नारखेडे, विकास पाचपांडे, ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी.पी.पाटील, चेतन पाटील, मुख्याध्यापक नितीन किरंगे, उपमुख्याध्यापक रमण भोळे उपस्थित होते.

आजचे युग आयटीचे
प्रमुख अतिथी प्राचार्य झोपे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,आजचे युग हे आयटी क्षेत्राचे युग आहे. आपणास संगणकाचे ज्ञान असले तरी ते हाताळायचे कौशल्य आपल्याजवळ पाहिजे. ते नसेल तर काहीही उपयोग नाही. आपल्याजवळ तंत्रज्ञानाचा सागर आहे, त्याचा उपयोग आपणास करून घेता आला पाहिजे. कोरोनानंतर आय.टी. क्षेत्राची गरज वाढली आहे.आपण काय शिक्षण घेतले त्यापेक्षा आपण त्या शिक्षणाचा उपयोग कसा करून घेत आहात हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. माजी प्राचार्य जी.पी.पाटील यांनी ज्ञानाचे रूपांतर कौशल्यात करण्याचे आवाहन केले.

काळासोबत बदलणे गरजेचे
डॉ.मकरंद नारखेडे म्हणाले की, बदलत्या काळासोबत पालक व विद्यार्थ्यांनी सुध्दा बदल केला पाहिजे त्यासाठी बदलत्या काळानुसार आता बदल आवश्यक आहे. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे वार्षिक नियतकालक पालवी 2022 कौशल्ययुक्त शिक्षण विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी अंकाच्या संपादीका ए.के.खाचणे यांचा गौरव करण्यात आला. मनोज कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी गुणवंत असे
पहिल्या गटात प्रथम- स्पर्श पाटील (चोपडा), हंसिका महाले (भुसावळ), वरद फेगडे (भुसावळ), दुसर्‍या गटात प्रथम सर्वस्वी बाविस्कर (चाळीसगाव), द्वितीय दामोदर चौधरी (जळगाव), तृतीय योगीती राठोड (चाळीसगाव), तिसर्‍या गटात प्रथम अपूर्वा पाटील (जामनेर), द्वितीय लीना सोनवणे (चोपडा), तृतीय अश्विनी पाटील (सुनसगाव, ता.भुसावळ), चौथा गटात प्रथम जागृती बारी (चोपडा), द्वितीय मयुरी शिरूडे (चाळीसगाव), तृतीय शिवानी उपाध्याय(भुसावळ), उत्स्फूर्त वक्तृत्व यात तिसर्‍या गटात प्रथम दिव्या पाटील (चोपडा), गुंजन पाटील (चाळीसगाव), तृतीय गायत्री सरोदे(चोपडा), गट चौथा प्रथम भाग्यश्री मंडवाले (भुसावळ), रोशनी सूर्यवंशी (भुसावळ), द्वितीय प्रियंका चित्ते (पिंपळगाव हरेश्वर),

सुगम संगीत स्पर्धा
सुगम संगीत प्रथम- धनश्याम कोळी (चोपडा), द्वितीय कोहिनूर तायडे (सांगवी, ता.यावल), तृतीय वैदेही चौधरी (भुसावळ), भूमिका चव्हाण (वाघळी), गट दोन मध्ये प्रथम ऐश्वर्या पाटील(भुसावळ),प्रणव पावार(चाळीसगाव), पियुषा नेवे (जळगाव).

शिक्षकांसाठी स्पर्धा
शिक्षकांसाठी असलेल्या कथा लेखन स्पर्धेत प्रथम किशोर पाटील यांची नवी दिशा या कथेला (साकरे ता.धरणगाव), द्वितीय दिनेश चव्हाण यांच्या दिनू या कथेला (चाळीसगाव), तृतीय जे.के.चौधरी यांच्या अघटीत कथेला (अमळनेर), काव्य लेखन स्पर्धेत प्रथम प्रतिभा पाटील (आठवण)(भुसावळ), मनिषा कडव (आला आषाढ श्रावण) (सायन, मुंबई), द्वितीय संगीता उपाध्ये (माझी शाळा) (शीव, मुंबई), तृतीय अजय भामरे (पाऊस आला) (अमळनेर)

कथा संग्रह राज्य पुरस्कार
प्रथम जयवंत बोदडे यांच्या मांडूळ या कथेला (मुक्ताईनगर), संयुक्ता राठोड चव्हाण यांच्या लगोरी काव्य संग्रह (सायन, मुंबई), कांदबरीस डॉ.श्रीकांत पाटील यांच्या ऊसकोंडी (हातकणगणे, जि.कोल्हापूर) प्रत्येक यशस्वी स्पर्धकांना 2001 रुपये रोख व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

निबंध स्पर्धा
निबंध स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम रूपल महाजन (चोपडा), द्वितीय समृध्दी तेली (पिंपळगाव हरेश्वर), तृतीय हर्षाली ठुबे (साकोरे), दुसर्‍या गटात प्रथम प्रणव भारंबे (फैजपूर), द्वितीय भार्गवी लेंडे (नाशिक), पौरवी गरूडे (भुसावळ), ओम गहिडे (सटाणा), तिसर्‍या गटात प्रथम भूमिका गवळी (चाळीसगाव), द्वितीय कोमल माळी (मेहरूण), तृतीय जान्हवी खैरनार(जळगाव), चौथ्या गटात प्रथम चैताली माळी (जामनेर), द्वितीय समर्थ कासार (म्हसदी), तृतीय अंकीता सूर्यवंशी (साकोरे) यांना बक्षीस व प्रमाणपत्र, रोख रक्कम देण्यात आली.


कॉपी करू नका.