मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील

0

चोपडा : रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यात शनिवारी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची प्रचार फेरी उत्साहात झाली. आजच्या प्रचार दौर्‍यात निमगव्हाण, खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरे, कोळंबा, वडगावसीम व मंगरूळ येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत श्रीराम पाटील यांनी संवाद साधला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी शिक्षक आमदार तात्यासाहेब दिलीपराव सोनवणे, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप भैय्या पाटील, माजी आमदार सुरेश बापू पाटील, गोरख तात्या पाटील, माजी सभापती जगन पाटील, हातेड सूतगिरणीचे संचालक रमेश नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील, राजेंद्र भास्कर पाटील, माजी सभापती डी.पी.साळुंखे, डॉ.चंद्रकांत बारेला, ललित बागुल, तुकाराम पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील मित्रपक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगरूळ पॅटर्न मतदारसंघात राबवणार
चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावच्या ग्रामपंचायतीचे कार्य सर्वार्थाने आदर्श व उत्कृष्ट आहे. हा पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

मंगरूळ गावात प्रचार फेरी आली असता त्यांनी ग्रामपंचायत इमारतीचीही पाहणी करून ग्रामपंचायतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी सरपंच उज्वला अतुल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतुल भीमराव ठाकरे, भैय्यासाहेब निकम, राजेंद्र ठाकरे, जगदीश निकम, संजय ठाकरे, शांताराम ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.