भुसावळातील आठवडे बाजारातील अतिक्रमणावर निवडणुकीनंतर हातोडा

0

Post-election hammering over encroachment in the Bhusawal market भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात असलेल्या 28 फळ विक्रेते दुकानदारांनी केलेले अतिक्रमण पालिकेकडून काढले जाणार होते मात्र बुधवारी यावर प्रांताधिकारी यांच्याकडे बैठक झाल्यानंतर निवडणूक आटोपताच हे अतिक्रमण काढण्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे 13 मे पर्यंत अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे.

निवडणूक संपताच निघणार अतिक्रमण
भुसावळ शहरातील आठवडे बाजारात फळ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण काढण्याचे नियोजन पालिकेने दोन ते तीन वेळेस केले होते मात्र काही ना काही अडचणी आल्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी प्रांत कार्यालयात पालिका अधिकारी यांची बैठक प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी घेतली. यात निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने मतदानानंतर हे व अन्य अतिक्रमण काढायचे यावर चर्चा झाली, अशी माहिती प्रांताधिकारी जितेद्र पाटील यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून अतिक्रमण काढण्याचे वारंवार नियोजन करण्यात आले व ते कोलमडले. यामुळे पालिकेच्या कारवाईकडे लक्ष लागले होते. आता मतदानानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.