खेडी खुनाने हादरले : पत्नीच्या खुनानंतर पतीची रेल्वेखाली आत्महत्या


जळगाव : पत्नीच्या खुनानंतर पतीनेही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खेडी हादरले आहे. संशयीत आरोपी पती समाधान रमेश साळवे याने पत्नी सोनी समाधान साळवे (30) हिचा मंगळवारी मध्यरात्री कुर्‍हाडीचे घाव घालून खून केल्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजता असोदा रेल्वे गेटवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

पत्नीच्या हत्येनंतर स्वतःही केली आत्महत्या
खेडीतील आंबेडकर नगरात वास्तव्यास असलेल्या समाधान साळवे व त्याचे कुटुंब हातमजूरी करीत आपला उदरनिर्वाह करत असतानाच मंगळवारी रात्री े दोन वाजता समाधान साळवे याने घरातील लोखंडी कुर्‍हाडीने पत्नी सोनीच्या गळ्यावर वार करीत तिचा खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला तर बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याने कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. असोदा गेटवर त्याचा मृतदेह आढळला. दरम्यान, मृत समाधान साळवे याचे वडील रमेश साळवे हे देखील खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मयत पती-पत्नीच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परीवार आहे. खूनाची माहिती कळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !