वरणगांव ग्रामीण रुग्णालयाच्या तिसर्या टप्प्याच्या बांधकामाला सुरूवात
डिपीडीसी योजनेतून निधी मंजूर : सहा महिन्यात होणार बांधकाम पूर्ण
वरणगाव : सर्व राजकीय पक्षांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या तिसर्या टप्प्यातील आंतर रुग्ण विभागाच्या रखडलेल्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. वरणगावकरांची दीर्घकालीन समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून गंभीर स्वरूपाच्या रुग्णाना जळगांव येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात नेण्याची गरज आता लवरकच थांबणार आहे. बांधकामाबाबत नगराध्यक्ष सुनील काळे तसेच आरोग्य दूत मिलिंद मेढे यांनी पाठपुरावा केला. डीपीडिसी योजनेंतर्गत 70 लाख रुपये निी मंजूर करण्यात आला असून बांधकाम सहा महिन्यात पूर्ण होणार आहे.
2000 पासून पाठपुरावा
शहरासह परीसरातील ग्रामीण विभागाची वाढती लोकसंख्या आणि शहरातून जाणार्या महामार्ग, लोहमार्गावर होणार्या अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता सन 2000 पासून येथील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी वरणगाव येथे ग्रामिण रुग्णालय व्हावे त्याकरीता पाठपुरावा सुरू केला होता त्या अनुषंगाने आघाडी शासनाच्या कार्यकाळात सन 2010 मध्ये प्रशासकीय मान्यता पूर्ण होऊन ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी मिळाली होत.ी त्यावेळी येथील पूर्वीपासुनचे जिल्हा परीदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा येथे हलवुन त्याच जागेवर ग्रामीण रुग्णालय बांधकामाचे महाराष्ट्र आरोग्य प्रशासकिय विभागाने नियोजन केले होते. 2013 मध्ये सर्व शासकिय, प्रशासकिय, जिल्हा प्रशासकिय आरोग्य विभागांची मान्यता पूर्ण करून रूग्णालयाची बाह्यरूग्ण तपासणी विभाग व प्रशासकिय आरोग्य विभाग, आंतर रूग्ण विभाग आणि कर्मचारी वैद्यकिय निवासस्थाने अशा तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या इमारतीचे बांधकामे मंजूर करण्यात आले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्कालीन पालकमंत्री या नात्याने विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्याकडून भूमिपुजनाचा कार्यक्रम करून बांधकामास सुरुवात केली होती. 2015 मध्ये ग्रामीण रुग्णालयाची बाह्यरुग्ण व प्रशासकिय तसेच कर्मचारी वैद्यकिय वसाहत अशा दोन इमारतीचे बांधकामे पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडे दिले होते. जिल्हा आरोग्य विभागाने इमारती ताब्यात घेऊन कर्मचार्यांना रहिवास आणि बाहय रूग्ण सेवा सुरू केली होती त्यानंतर आंतररुग्ण विभागाला मंजूरी असतांना बांधकाम निधी अभावी रखडले होते.



पाठपुराव्यानंतर मिळाला निधी
वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे व सामाजिक कार्यकर्ता आरोग्यदुत मिलिंद मेढे यांच्या प्रयत्नांनी डिपीडिसी योजनेच्या माध्यमातून 70 लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्या माध्यमातून वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या तिसर्या टप्प्यातील आंतररूग्ण विभागाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. रुग्णालयात अद्यावत सेवा, महिलांची डिलेव्हरी, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग, अपेक्षित वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग पुरेसा मिळेल तर आघातातील अति गंभीर रूण जळगाव नेत असतांना उपचाराअभावी दगावतात अशा रुग्णांना जिवनदान मिळू शकेल.
