पुन्हा भाजपात जाणार का ? ; नाथाभाऊ म्हणाले ; मी खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही


Will you go to BJP again? ; Nathabhau Said ; I’m Not One To Be Sold On The Box मुक्ताईनगर : माजी मंत्री खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच सोमवारी आमदार खडसे यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, नाथाभाऊ आता भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही शिवाय मी खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही.राष्ट्रवादीने मला आमदारकी दिली, प्रतिष्ठा दिली त्यामुळे आता मी पुन्हा भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही.

साहेबांसोबत घेणार अमित शहांची भेट
शरद पवार साहेबांसोबत मी अमित शहांची भेट घेणार आहे त्यामुळे होणार्‍या चर्चांना काहीही अर्थ नाही. तीन तास मी भेटीसाठी थांबून होतो, असे खासदार रक्षा खडसे यांनी गिरीश महाजनांना सांगितल्याचे काल महाजन म्हणाले होते. यावर खडसे म्हणाले की, मी खासदारांशी चर्चा केल्यानंतर रक्षा खडसे यांनी असे काहीही सांगितले नाही, असे सांगितले. अमित शहांची भेट घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आल्याचे व दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचे रक्षा खडसे यांनी महाजनांना सांगितले असल्याचे खडसे म्हणाले. अमित शहांच्या भेटीचे कारण काय याबाबत माध्यमांना सर्वच कारणे सांगायची नसताही, असेही खडसे म्हणाले.

आता काय मिटवायचे सर्वच तर सुरूच आहे
ईडी, सीबीआय, अ‍ॅन्टी करप्शनची चौकशी सुरू असताना आता काय मिटवायचे आहे? असा प्रश्न खडसे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

श्रद्धा सबुरीची महाजनांना गरज
आपण गिरीश महाजनांची लहान पणापासूनच काळजी घेतली असून त्यांनी आता माझी काळजी करण्याची गरज नाही. श्रध्दा आणि सबुरीची गरज मला नव्हे तर त्यांना आहे, अशा शब्दांमध्ये खडसेंनी महाजनांवर जोरदार पलटवार केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !