धुळ्यातील भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादीच्या वाटेवर


मुंबई : धुळ्यातील भाजपचे माजी आमदार अनिल गोटे हे गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने अनिल गोटे नाराज होते. नाराज असणार्‍या अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा त्यानंतर राजीनामा दिला होता. तेव्हापासून अनिल गोटे भाजपविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. तीच भूमिका त्यांनी धुळ्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कायम ठेवली मात्र भाजपला धक्का देणे त्यांना शक्य झालं नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !