आपलं तेली समाज संघ, मुंबई संस्थेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी उज्वला बागुल


भुसावळ : आपलं तेली समाज संघ मोफत वधू वर सूचक मंडळ, महाराष्ट्र राज्य (मुंबई) स्थित असलेल्या संस्थेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी शहरातील पत्रकार उज्वला बबनराव बागुल यांची नियुक्ती करण्यात आली. तेली समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या लिखाणातून सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याने या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
महाराष्ट्र राज्य स्तरावरून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत वाडीभस्में, मावळ तालुकाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जळगाव जिल्हाध्यक्ष संतोष बळीराम चौधरी, नाशिक तेली समाज सचिव सुनील शिरसाठ, जगदीश जाधव, पंडित जाधव, राजेंद्र पंडित, नंदकुमार भागवत, गणेश सोनवणे, निलेश सोनवणे, राजेश सहदेव सोनवणे, नरेश सोनवणे, मंदार बागुल, संतोष बागुल, मुरलीधर कळसकर, सुधाकर चौधरी, किशोर गवळी, अनिल बागुल, चंद्रकांत बागुल यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी बागुल यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहचून कार्य करणार असल्याचेही उज्वला बागुल म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !