ठाकरेंच्या मशालीपुढे शिंदे गट ढाल-तलवारीच्या चिन्हाद्वारे लढणार !
In front of Thackeray’s torch, the Shinde group will fight with the shield-sword symbol! मुंबई : निवडणक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे चिन्हाचा वाद तात्पुरता मिटला आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गटाला ढाल-तलवार देण्यात आले आहे. आता शिंदे गट ढाल-तलवार घेऊन अंधेरीतील पोटनिवडणुकीच्या रींगणात उतरणार आहे.
तीन चिन्हांचा दिला होता पर्याय
निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली होती. तर, दुसर्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची हे पर्याय ठेवले होते त्यातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव शिंदे गटाला मिळाले.

ठाकरे गटाला मिळाले मशाल चिन्ह
उद्धव ठाकरे यांच्या गटाने तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय दिल्यानंतर मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाले. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले असून त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले होते. त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला मिळाले आहे.