भुसावळातील हनुमान नगरातून सायकल लांबवली


Bicycle in Hanuman Nagar in Bhusawal extended भुसावळ  : शहरातील हनुमान नगर, गुरूकृपा टेंट हाऊसजवळून चोरट्यांनी तीन हजार पाचशे रुपये किंमतीची सायकल लांबवल्याची घटना 2 रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात सोमवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार नंदलाल रतनदास चावराई (71, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी त्यांचा मयूर नातवासाठी तीन हजार पाचशे रुपये किंमतीची हिरो कंपनीची सायकल खरेदी केली होती. घराबाहेर कुणी नसल्याची संधी चोरट्यांनी साधत 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते एक दरम्यान सायकल लांबवली. तपास नाईक अर्चना अहिरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !