सकल लेवा पाटीदार समाजातर्फे विवाहोच्छुक युवक-युवतींना आवाहन


Sakal Lewa Patidar Samaj appeals to young men and women who want to get married
भुसावळ :
सकल लेवा पाटीदार समाजातर्फे लवकरच समाजाची वधू-वर सुची अद्यावत करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. विवाहोच्छुक युवक-युवतींनी आपापली माहिती फॉर्म संकलित केंद्रांवर गुरुवार, 20 ऑक्टोंबर 2022 पर्यंत कल्पना रसवंती सेंट, जामनेर रोड, भुसावळ तसेच मामा पाचपांडे पान सेंटर तसेच ओम इलेक्ट्रिकल (जळगाव), प्रियंका इलेक्ट्रिकल (सावदा), महाजन बुक डेपो (फैजपूर) येथे संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने देखील माहिती संकलित केली जात आहे.

संकेतस्थळावरही होणार नोंदणी
भारतातील व भारताबाहेरील सकल लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छूक युवक-युवतींनी https://levayuva.com/ http://sakallevapatidar.org या संकेतस्थळावर आपली नावे नोंदवावी, असे आवाहन शहराध्यक्ष देवेंद्र वाणी यांनी केले आहे. अधिक माहिती करिता -9404533255, 9373400011, 9860791180 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !