विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड
भुसावळ : जळगावात नुकत्याच झालेल्या शालेय जिल्हास्तर योगा स्पर्धेत वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याने या विद्यार्थ्यांची नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. खूपचंद सागरमल हायस्कूल, जळगाव येथे नुकत्याच शालेय जिल्हास्तर योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 14 वर्षीय गटात प्रथम धारव नेमाडे, द्वितीय निखील भोई, चतुर्थ अविनाश मोहोळ, पाचवा अभिनव जोहरे, सहावा कृष्णा मगरे, सातवा प्रसाद येवले तर 17 वयोगटात प्रथम आशुतोष भोई, द्वितीय दर्शन महाजन, तृतीय प्रणव पालिमकर तर 19 वर्ष गटात प्रथम शहिद खान पठाण, द्वितीय सचिन जोहरे, तृतीय तुषार जोहरे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांची निवड नाशिक विभागीय योगा स्पर्धेसाठी करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे, संस्थाध्यक्ष वंदना पाटील, सचिव चंद्रशेखर झोपे, मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जयंत जोशीख, आशिष चौधरी, लक्ष्मीकांत नेमाडे यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा मल्लखांब स्पर्धेचे आयोजन
शासकीय शालेय जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा मलखांब असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मलखांब स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. उद्घाटन शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे, सहसचिव प्रदीप भंगाळे, संचालक प्रशांत झोपे, विक्रम देशमुख, रमेश चौधरी, मुख्याध्यापक वंदना चव्हाण, उपमुख्याध्यापक रूपा कुलकर्णी, पर्यवेक्षक पी.जे.पाटील, बी.एम.राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक आशिष चौधरी तर आभार लक्ष्मीकांत नेमाडे यांनी मानले.

क्रीडा केंद्र व समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
शासकीय शालेय जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित जिल्हास्तरीय मलखाण स्पर्धेच्या आयोजन वेळी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संचलित क्रीडा केंद्र व समुपदेशन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करण्यात येईल.