एरंडोल तालुक्यातील तरुणीवर औरंगाबादमध्ये बलात्कार : तरुणाला अटक
Arandol taluka girl raped in Aurangabad: Youth arrested एरंडोल : एरंडोल तालुक्यातील एका गावातील तरुणीला औरंगाबाद येथे नेल्यानंतर तरुणाने अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे तर तरुणाने अल्पवयीन तरुणीला माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करुन तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी देत पळवून नेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, औरंगाबाद येथून पीडीत तरुण-तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे.
धमकावून नेले औरंगाबाद
एरंडोल तालुक्यातील एका गावातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आल्यानंतर तपासादरम्यान बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथे गेल्यानंतर पोलिसांनी संशयीत तरुण दिनेश बाबूलाल पवार यास व तरुणीस ताब्यात घेतले. यावेळी पीडीतेने पोलिसांना सोमवार, 3 रोजी संशयीताने पीडीतेस धमकावून औरंगाबाद येथे नेले व जोगेश्वरी नगरात भाड्याने खोली घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपी पवारविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.
