राजस्थानी विप्र नवयुवक मंडळ अध्यक्षपदी नमा शर्मा यांची निवड


भुसावळ : शहरातील कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांची राजस्थानी विप्र नवयुवक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजस्थानी विप्र समाजाचे अध्यक्ष डॉ.कमलकांत शास्त्री यांनी ही निवड केली.

यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
समाजाचे उपाध्यक्ष गोपाल तिवारी, सचिव संतोष जी.नागला, कोषाध्यक्ष पंडित जगदीश शर्मा यांनी निवडीला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सदस्यांनी नमा शर्मा यांचा यावेळी सहृदय सत्काचर केला. प्रसंगी सदस्य राजू पारीख, पं.रवीओम शर्मा, पंडित रामनारायण जोशी, पारस शर्मा, कैलाश उपाध्याय, विजय ठक्कर, माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी आदी समाजबांधव उपस्थित होते. निवडीनंतर नमा शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !