भुसावळातील शिवरत्न प्रतिष्ठान महिला मंडळाकडून कष्टकरी महिलांचा गौरव

हातमजुरी करून संसाराला लावताय हातभार : 135 महिलांना साडीसह फराळाचे वाटप


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 च्या माजी नगरसेविका व शिवरत्न प्रतिष्ठान महिला मंडळाच्या संचालिका सोनल रमाकांत महाजन यांनी कष्ट करून तसेच हातमजुरी करून आपल्याला संसाराला हातभार लावणार्‍या 135 महिलांना रविवार, 16 रोजी साडीसह फराळाचे वाटप केले. शहरातील शिव कॉलनी, संत शिरोमणी सेना महाराज (नाभिक संघ) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी महिलांशी महाजन यांनी संवाद साधून त्यांच्या आधार कार्डासह मतदान कार्ड, रेशन कार्डबाबत समस्या ऐकून घेत त्या आगामी काळात सोडवण्याचे आश्वासन दिले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भाजप शहराध्यक्षा अनिता आंबेकर, नाभिक संघाच्या अध्यक्ष्या चित्रा सोनवणे, प्रणाली सूर्यवंशी, शोभा निकम, सीमा आमोदे, शिवरत्न प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री बादशहा, वैशाली वंजारी, उषा मोरे, प्रियंका चौधरी. चैताणी राणे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !