Don’t worry, everything is ok : Khadse’s reaction after meeting Sanjay Raut तुम्ही सगळी चिंता करू नका, सर्व काही ओक्के : संजय राऊत भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया
Don’t worry, everything is ok : Khadse’s reaction after meeting Sanjay Raut मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनावरील सुुनावणी पुढे ढकलण्यात आली असून जामीन अर्जावर आता 21 ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल. दरम्यान आज या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची संजय राऊत यांच्यासोबत कोर्टासमोर भेट झाली. या भेटीबाबत खडसे यांना विचारल्यानंतर तुम्ही सगळी चिंता करू नका, सर्व काही ओक्के असल्याचे राऊत म्हणाल्याचे ते म्हणाले.
कोर्टासमोर झाली भेट
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांची कोर्टासमोर भेट झाली. यावेळी एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केली. राऊत मला म्हटले लवकरच बाहेर येणार आहे. सर्व काही ओके आहे, तुम्ही सगळी चिंता करु नका, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?
ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खाजगी विकासकाला विकला. म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे 25 टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.