अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात 425 जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

सातपुड्यातील गायरान येथे राबविला उपक्रम ; यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष


भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील गायरान आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात 175 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य,गहू तांदूळ, पणत्या, साबण, अगरबत्ती, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले. दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील गायरान येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला. यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, सह समन्वयक अमित चौधरी, विक्रांत चौधरी, भूषण झोपे हे होते. अमोल हरीभाऊ जावळे, योगेश इंगळे, श्रीकांत जोशी, जीवन महाजन, समाधान जाधव, संजय भटकर, प्रसन्ना बोरोले,श्याम माळी, राजु सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हरीश भट, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप रायभोळे, दीपक जावळे, शैलेंद्र महाजन, मिलिंद राणे, रुपेश पाटील, राहुल भारंबे, भरत इंगळे, विपीन वारके, ललित महाजन, नितीन लोखंडे, उमेश फिरके, शैलेंद्र वासकर, दिलीप कलाल, किरण नेमाडे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उप्रकाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जोरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे या उपक्रमास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे, सह समन्वक अमित चौधरी, विक्रांत चौधरी, भूषण झोपे यांनी दिली. शहरी लोक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !