भुसावळात खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे 6 रोजी रन फॉर युनिटी
Run for Unity on 6th by Khandesh Sports Club in Bhusawal भुसावळ : खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 वी जयंतीचे औचित्य साधून शहरात रन फॉर युनिटी स्पर्धेचे 6 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. तीन व पाच किलोमीटर अंतरासाठी स्पर्धेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून प्रारंभ होईल अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्पोर्टस् क्लबचे योगेश तिवारी यांनी पत्रकार परीषदेत केले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्काचे आवाहन
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, नवीन कुकरेजा, राजेश प्रजापती, तुषार सुरवाडे आदी उपस्थित होते.
खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे रन फॉर युनिटी स्पर्धेला 6 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ होईल. सकाळी साडेपाच वाजता पाच किलोमीटर अंतरासाठी तर सकाळी 6.30 वाजता तीन किलोमीटर अंतरासाठी दुसरा गट धावेल. नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी नवीन कुकरेजा (8805858805), योगेश तिवारी, राजेश प्रजापती, तुषार सुरवाडे यांच्याशी संपर्क साधावा.

