भुसावळ विभागात लोहपुरुष सरदार पटेल यांना अभिवादन

जयंती उत्साहात : भुसावळ विभागात ठिकठिकाणी रन फॉर युनिटीचे आयोजन : शहरात अभिवादनासाठी उसळली गर्दी


भुसावळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जुना सातारा भागातील पुतळ्याला अभिवादनासाठी दिवसभर शहरवासीयांची गर्दी उसळली होती. या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा देण्यात आले तसेच रन फॉर युनिटीचेही आयोजन करण्यात आले. भुसावळ विभागातील विविध सामाजिक संस्था, राजकिय पक्ष, संघटना, शाळा, महाविद्यालय, शासकिय कार्यालयांमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भुसावळ
भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा संघटक सचिव प्रा.डॉ.सुनील नेवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी आदी उपस्थित होते.



भुसावळात एकता रनचे आयोजन
भुसावळ : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सोमवारी सकाळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर एकता रनचे आयोजन करण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ संघ, भारत स्काउट्स व गाईड, क्रीडा संघटनांचे सदस्य सहभागी झाले. भुसावळ स्थानकावर सरदार पटेल यांच्या जीवनावरील प्रदर्शनही भरवण्यात आले. प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्या हस्ते सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देण्यात आली. अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुकमय्या मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहायक कार्मिक अधिकारी बी.रामटेके, गोविंदकुमार सिंग व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले.

भुसावळ शहरात मनसेतर्फे अन्नदान
भुसावळ :
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनसेतर्फे सकाळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोरगरीबांना अन्नदान करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष धीरज वाघमारे, शहराध्यक्ष प्रतीक भंगाळे, शिवा वाढे, दशरथ सपकाळे, युवराज पाथरवट, पवन साळुंके, गणेश कोळी, दीपक सोनवणे, अनिल कोळी, शेख साहिल, निसार शेख आदींची उपस्थिती होती.

श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस
भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना डॉ. सुधीर शर्मा यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सरदार पटेल यांचा कार्याचा व जीवन परीचय दिला. डॉ.सुधीर शर्मा, डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे, प्रा.प्रवीण जाधव, प्रा.हितेश गुप्ता, अंकित सारस्वत्व आदी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोळे महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील क्रिडा विभाग, रासेयो, विद्यार्थी विकास विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर जावून अभिवादन करण्यात आले. आमदार संजय सावकारे, माजी सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य प्राचार्य डॉ.राजू फालक, तालुका शिक्षणाधिकारी किशोर वायकोले उपस्थित होते. क्रीडा संचालक डॉ.एस.डी.चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.जी.पी वाघुळदे, डॉ.माधुरी पाटील, डॉ.बी.ए.बेंडाळे, डॉ.डी.एस.राणे, प्रा.ए.आ.सावळे, प्रा.ए.जी.नेमाडे उपस्थित होते.

पालिकेतर्फे रन फॉर युनिटी
भुसावळ : नगरपालिकेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापर्यंत रन फॉर युनिटी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला. प्रांताधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

सर्व शक्ती सेनेतर्फे अभिवादन
भुसावळ :
शहरातील सर्व शक्ती सेना तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली. सर्व शक्ती सेनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सर्व शक्ती सेना युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गजानन कांडेलकर, युवक जिल्हाध्यक्ष विष्णू मोरे, आकाश कोळी, हर्षल भोळे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवक जिल्हाध्यक्ष मयुर कोळी, डॉ. महेंद्र सुरवाडे जिल्हा कार्याध्यक्ष विजय तायडे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज कोळी, सिकंदर तडवी आदी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे अभिवादन
भुसावळ : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुका प्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबायत, तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख बबलू बर्‍हाटे, वरणगावचे संतोष माळी, पप्पु बारसे, प्रा.धीरज पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मुक्ताईनगरात लोहपुरूषाला अभिवादन
मुक्ताईनगर :
गुर्जर नवयुवक मंडळ यांच्या वतीने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शहरातील प्रवर्तन चौकात आयोजित कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे , काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील यांनी उपस्थित राहून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह डॉ.जगदीश पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण, रेवा गुर्जर नवयुवक मंडळ अध्यक्ष सचिन पाटील, श्रीकांत पाटील, मदन महाजन, मराठा सेवा संघ प्रणित वस्तीगृह कक्षाचे राष्ट्रीय सचिव दिनेश कदम, मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, चंद्रकांत भोलाणे, गणेश महाजन, राहुल पाटील,जितेंद्र पाटील, पंकज कोळी, रहस्य महाजन, अनिल महाजन, धनराज सापधरे, राजु जाधव, शुभम तळेले, प्रतीक महाजन, स्वप्नील पाटील, योगेश पाटील, विराज पाटील, संजय वाढे, अनिल महाजन, परेश पाटील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !