चोपड्याचे कृषी पर्यवेक्षक दुचाकी अपघातात ठार


Agricultural supervisor of Chopda killed in two-wheeler accident चोपडा : भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने चोपड्याचे कृषि पर्यवेक्षक मनोहर फकिरा पाटील (ह. मु.छत्रपती शिवाजी नगर,परीस पार्क, मूळ रहिवासी दोंडवाडे, ताचोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला.

चोपडा शहरात हळहळ
कार्यलयाचा कामासाठी आपल्या कार्यक्षेत्रावरून काम आपटून कृषि पर्यवेक्षक मनोहर फकिरा पाटील हे आपल्या मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 19 बी आय 0154) ने चोपड्याकडे येत असताना गूळ नदीचा पूल पार करून हॉटेलं दाजीबा जवळ मजूर भरलेली (नंबर एम.एच.19 सी.डबल्यु 9275) मागून येणार्‍या ट्रकने मोटार सायकलला धडक देऊन तीस ते चाळीस फूट फरफटत नेले यात मनोहर फकिरा पाटील यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने व ते ट्रकच्या बंपर मध्ये अडकले होते. ट्रक ड्रायव्हरने तरीही आपल्या हातातील ट्रक तशीच पुढे नेण्याचे प्रयत्न केला परंतु मोटारसायकल व मनोहर पाटील हे स्वतः अडकल्याने ट्रक काही अंतरावर जाऊन थांबली



अपघातानंतर ट्रक चालक पसार
तद्नंतर ट्रक ड्रायव्हर हा अपघाताची स्थिती पाहिल्या नंतर थेऊन पसार झाला. परंतु मनोहर पाटील हे त्याचजागी ठार झाले. मनोहर पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी ही वार्ता गावात कळताच शहरातील त्यांचे नातेवाईक ,मित्र मंडळी,परिसरातील मंडळीनी गर्दी केली. त्यांच्या पश्चात धर्मपत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !