भरदिवसा फायनान्स कर्मचार्‍याकडील 67 हजारांची रोकड लुटली


67 thousand cash was stolen from a finance employee in broad daylight धुळे : भारत मायक्रो फायनान्सच्या कर्मचार्‍याचा रस्ता अडवत लुटारूंनी दिवसभरात जमवलेली कलेक्शची 67 हजारांची रोकड भर दिवसा लुटल्याची घटना धुळे तालुक्यातील जुन्नर रस्त्यावर बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लुटून नेली. या प्रकरणी सोनगीर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीवरून लुटारू पसार
भारत मायक्रो फायनान्सचे कंपनीचे नागेश मोतीलाल गायकवाड (24, रा. हुडको पाटील कॉलनी) हे बुधवार, 2 रोजी दोन वाजेच्या सुमारास कंपनीचे कलेक्शनची पैसे गोळा करून दुचाकीने जुन्नर रस्त्याने जात असताना खडीक्रशर समोर दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी त्यांच्याकडील कलेक्शनचे 67 हजार रूपये जबरीने लुटून नेले. पुढील तपास सहा.निरीखक चंद्रकांत पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !