जळगाव कारागृहात कैद्याचा लोखंडी खिळा गिळून आत्महत्येचा प्रयत्न
A prisoner attempted suicide by swallowing an iron nail in Jalgaon Jail जळगाव : जिल्हा कारागृहातील कैद्याने जामीन नामंजूर झाल्याच्या संतापात लोखंडी खिळा गिळून आत्महत्येचा प्रकार केल्याची धक्क्कादायक घटना गुरुवार, 3 रोजी सकाळी 10 ते 10.30 दरम्यान जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी चेतन पितांबर सोनार (26) या तरुणाविरोधात जिल्हा कारागृहात गुन्हा दाखल करण्यात आला.
खिळा गिळून आत्महत्येचा प्रयत्न
तुरुंग अधिकारी संतोष पोपटराव पवार यांच्या फिर्यादीनुसार ते कर्तव्यावर असतांना चेतन सोनार या कैद्याने जामीन न्यायालयाने नामंजूर केल्याचे समजल्यानंतर जेलच्या बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवार, 3 रोजी रोजी सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. कैद्यास तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले तर या प्रकरणी चेतन विरोधात भादंवि 309 नुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.


