बोदवड शहरात अवैध 41 ओंडक्यांवर वन विभागाची जप्तीची कारवाई


Forest department confiscates 41 illegal eggs in Bodwad city बोदवड : मुक्ताईनगर तालुक्यातून अवैधरीत्या वृक्षतोड केल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे ओंडक्याची वाहतूक केल्यानंतर शहरातील राज हॉटेलच्या मागे ते फेकण्यात आले होते. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनपाल उमाकांत कोळी यांनी तक्रारदार व छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांच्यासमक्ष रात्रीच्या सुमारास पाहणी केल्यानंतर वनपाल उमाकांत कोळी व वनरक्षक दिपाली शिर्के यांनी पंचनामे केले.

लाकडाचे 41 ओंडके केले जप्त
पंचनाम्यात एकूण 41 लाकडाचे ओले ओंडके जप्त केले आहेत. त्यात निम 07, वावळी 22, पळस 1, बाभूळच्या 11 ओंडक्यांचा समावेश आहे. बोदवड तालुक्यात सॉ मील चालक बेकायदेशीररीत्या वृक्षतोड करून लाकडी ओंडक्यांचा अवैध साठा सॉ मील परीसरात साठवित असल्याबाबतच्या तक्रारी राष्ट्रीय छावा संघटनेचे संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांनी वन विभागाकडे केल्या आहेत. सहाय्यक वनसंरक्षक व वन परीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्याकडून याबाबत चौकशी करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !