चितोडा गावातून छोटा हत्ती वाहन अज्ञात चोरट्यांनी लांबवले
The small elephant vehicle was stolen from Chitoda village by unknown thieves यावल : तालुक्यातील चितोडा येथे दुकानाच्या बाहेर लावलेले छोटा हाती वाहन अज्ञात भामट्यांनी मध्यरात्रीनंतर लांबवले. चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून याप्रकरणी यावल पोलिसात रात्री उशिरा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद
चितोडा, ता.यावल येथील सातपुडा कृषी केंद्राच्या बाहेर प्रशांत निवृत्ती धांडे यांच्या मालकीचे छोटा हाती वाहन (क्रमांक एम.एच. 19 एस. 9775) हे लावले असता मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात भामटे वाहनाजवळ आले व त्यातील एकाने कुठल्यातरी चावीने छोटा हत्तीच्या दरवाजा उघडून आत प्रवेश करून वाहन लांबवला. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. दरम्यान, एका दुचाकीवर तीन जण चितोडा गावात आल्याचे सीसीटीव्हीत दिसत असून अंधारात दुचाकी लावल्यानंतर एकाने दुचाकीने तर दोघांनी छोटाहत्ती वाहन पळवल्याचे उघड झाले आहे.

