भुसावळात हातचलाखीने एटीएम बदलत एकाला 32 हजारांचा घातला गंडा
भुसावळातील एकाची फसवणूक : भामट्याने एटीएममधून रक्कम काढताना पीनकोड पाहत हातचलाखीने बदलले एटीएम
In Bhusawal, a person was cheated by changing the ATM of 32 thousand भुसावळ : एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाला 32 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एटीएमची हातचलाखीने अदलाबदली
शहरातील ताज नगरातील रहिवासी जहिरूद्दीन गयासुद्दीन मोमीन (32) हे भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत असलेल्या एटीएममध्ये शुक्रवार, 4 रोजी दुपारी तीनच्या सुमारास गेले असता त्यांच्या मागे एक युवक उभा होता, त्याच्या डोक्यात निळी टोपी होती. त्याने जहिरूद्दिन यांनी एटीएममध्ये टाकलेला पीन कोड पाहिला व या अनोळखी युवकाने मी तुम्हाला एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो, असे सांगत एटीएम कार्डची अदलाबदली केली.


अनोळखीविरोधात बाजारपेठ पोलिसात तक्रार
अनोळखी व्यक्तीने आनंद नगर, शाखेतून एटीएम शुक्रवारी 35 हजार रुपये काढत पोबारा केला. या प्रकरणी फिर्यादी जहिरूद्दिन मोमीन यांनी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार सत्तार शेख करीत आहे.