मुंबईतील प्रवाशाचा भुसावळातून मोबाईल लांबवला
The mobile phone of a passenger in Mumbai was stolen from Bhusawal भुसावळ : मुंबई येथील प्रवाशाचा भुसावळातील रेल्वे स्थानक परीसरातून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
गजानन रामा मोरे (42, मोयखेडा दिगर, ता.जामनेर, ह.मु.जे.डी.मैदानजवळ, मरोळ पाईप लाईन, मुंबई) मंगळवार, 1 रोजी रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान रेल्वे स्थानकाजवळील चिंतामणी हॉटेलवर ते चहा पिण्यासाठी आल्यानंतर चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल लांबवला. तपास एएसआय शरीफ काझी करीत आहेत.

