A prisoner on promissory leave escaped from Bhusawal अभिवचन रजेवर आलेला कैदी भुसावळातून पसार
A prisoner on promissory leave escaped from Bhusawal भुसावळ : कोविड काळात अभिवचन रजेवर आलेला शहराजवळील कंडारी येथील कैदी पसार झाल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुधाकर बाबूराव इंगळे (कंडारी) असे पसार कैद्याचे नाव आहे.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
इंगळे यांच्या विरोधात गुरनं.12/1996 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यास तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात हलवले होते मात्र कोरोना संकट आल्यानंतर इंगळे यांना 45 दिवसांच्या अभिवचन रजेवर सोडण्यात आले मात्र रजेचा कालावधी संपूनही कैदी हजर न झाल्याने ते पसार झाल्याबाबत भुसावळ शहर पोलिसात औरंगाबाद कारागृहाचे कर्मचारी संजय काशीनाथ पाटील (49) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय ईकबाल सैय्यद करीत आहेत.

