यावल शहरात दुचाकी अपघात ; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर
Two-wheeler accident in Yawal City ; Two injured, one in critical condition यावल : शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या एसआर पेट्रोल पंपाजवळ दुचाकी घसरून दुभाजकावर धडकल्याने दोघे जखमी झाले तर एकाला जबर दुखापत झाल्याने त्यास यावल ग्रामीमण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले.
दुचाकी धडकल्याने दोघे जखमी
यावल शहरात चोपडा रस्त्यावर एस.आर.पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाजवळ रात्री दुचाकीद्वारे हेमंत रामचंद्र मराठे (42, रा.गीताई नगर, जळगाव) व सुभाष शालिक पाटील (45, रा.मोहराळा) हे दोघे यावल शहरातून मोहराळाकडे जात असताना दुभाजकाजवळ दुचाकी घसरली आणि ती दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. दोघांना तातडीने रीक्षा चालक शेख इम्रान (पिंजरवाडा) यांनी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आल्यानंतर डॉ.इरफान खान, अधिपरीचारीका दीपाली किरंगे, बापू महाजन आदींनी उपचार केले. यातील हेमंत मराठे यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

