यावलला मंत्री सत्तारांच्या प्रतिमेला मारले जोडे


Offensive statement about MP Supriya Sule : Burning effigy of Minister Sattar यावल : खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्याने त्याच्या निषेधार्थ यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष प्र .मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली मंत्री सत्तार यांचा जाहीर निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर प्रतिमेचे दहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात राष्ट्रवादीचे एम.बी.तडवी, अ‍ॅड.देवकांत पाटील, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, जिल्हा पदाधिकारी विजय प्रेमचंद पाटील, डॉ.हेमंत येवले, अय्युब खान, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक प्रशांत चौधरी, नरेंद्र शिंदे, कामराज धारू, अरुण लोखंडे, गोलु माळी, आबीद कच्छी, आरीफ खान, हितेश गजरे, रोहन शेख, बापू जासूद, सरफराज तडवी, अब्दुल सईद शेख, राहुल गजरे, डी.सी.पाटील, दीपक तडवी, मयुर पाटील, सत्तार तडवी, भूषण नेमाडे, गिरीष पाटील, मोहसीन खान, एजाज देशमुख, समाधान पाटील, शरीफ तडवी, यांच्यासह असंख्य पक्षाचे कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !