भुसावळातील समाजसेवक सारंगधर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


भुसावळ : शहरातील समाजसेवक तथा हॉटेल न्यू पंजाब खालसाचे संचालक सारंगधर पाटील उर्फ छोटूभाऊ पाटील यांचा सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने दिवसभर हितचिंतक, मित्र परीवार व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मिडीयातील विविध साधनांद्वारे शुभेच्छा देत सारंगधर पाटील यांच्या दीर्घायुष्याची कामना केली.

पदाधिकार्‍यांसह मित्र मंडळींचा जमला गोतावळा
शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक संतोष बारसे, पापा बारसे, सिकंदर खान, संजय आवटे, गौरव आवटे, माजी नगरसेवक किरण कोलते, रूपेश देशमुख, मामा पाटील, किशोर कोलते, रवी धाडे, गब्बर चावरीया, मुकेश गुंजाळ, सनी गोणे, सुशील जंगले, गुरू श्रीवास, खेळाडू सचिन पाटील, गो सेवक रोहित महाले, गणेश फॅन्सी शॉपचे धनू सेठ, संदीप दाभोळे, बल्ली भाई यांच्यासह विविध ग्रुपच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट घेवून सारंग पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली.



कोरोनाकाळात दातृत्वातून उमटवला ठसा
देशावर कोरोनाचे संकट आल्यानंतर लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. अत्यंत कठीण अशा प्रसंगात वाहतुकीची साधनेही उपलब्ध असतानाही कोरोनामुळे कुणी घराबाहेर पडत नसल्याने प्रवाशांना पायपीट करीतच आपापल्या गावाची वाट धरावी लागली होती. मजल-दरमजल करीत अनेक गोरगरीब मजूर डोक्यावर सामानाचे गठोडे ठेवून जळगावकडून मुक्ताईनगर, वरणगाव, बुलढाण्याकडे निघाल्यानंतर या गरजूंची दोन वेळच्या पोटभर जेवणाची सोय शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच हॉटेल न्यू पंजाब खालसाचे संचालक छोटूभाऊ (सारंगधर) पाटील यांनी त्यावेळी स्व-खर्चातून केली होती. विशेष म्हणजे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत अहोरात्र प्रवाशांची भूक भागवून कुठलाही गाजावाजा न करता खर्‍या अर्थाने छोटूभाऊ हे त्यावेळी प्रवाशांचे तारणहार ठरल्याने जिल्ह्यात त्यांच्या कार्याचे कौतुक झाले होते. समाजाचे आपणही देणं लागतो व जेव्हढी शक्य आहे तेव्हढी मदत करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचा नम्रतापूर्वक छोटूभाऊ नेहमीच सांगतांना दिसून येतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !