सावदा शहरातून महागडी दुचाकी चोरट्यांनी लांबवली


Expensive two-wheeler stolen from Sawada city by thieves सावदा : शहरातील खिरोदा रोडवरील कुलसूमबी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
सुनील सुरेश सपकाळे (36, राजबाग, फैजपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी ज्युपिटर दुचाकी (एम.एच.19 डी.ए.4846) ही खिरोदा रोडवरील कुलसूमबी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत लावली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून गुरुवार, 3 रोजी दुपारी दोन ते आठ दरम्यान संधी साधून दुचाकी लांबवली. तपास एएसआय महेमूद शहा कादर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !